
Grand League आणि Small League जिंकण्यासाठी फक्त मोठ्या नावांवर विश्वास ठेवून चालणार नाही. Hidden Gems शोधणे, Pitch Report समजून घेणे, आणि Data-Driven Decisions घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. या लेखात तुम्हाला रणजी आणि दिलीप ट्रॉफी तील महत्त्वाचे प्लेयर्स, Form Over Reputation संकल्पना, आणि Conditional Captain ची यासारख्या स्मार्ट टिप्स मिळतील, ज्या तुमच्या Dream11 Grand League टीमसाठी हिरो ठरतात.
Dream11 Grand League & Small League: साठी काय आहे महत्त्वाचे ?
“Ranji & Duleep Trophy Stars” – कमी प्रसिद्ध पण पॉईंट्स देणारे खेळाडू
बॅट्समन:-
IPL किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकणारे अनेक खेळाडू हे रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी मध्ये खेळून आले असतात. IPL मध्ये ते दडपणाखाली कसे खेळतात, त्यांचा स्ट्राइक रेट आणि विकेट घेण्याची क्षमता कशी आहे, यावर लक्ष ठेवा. अनेकदा हे खेळाडू कमी प्रसिद्ध असल्यामुळे Dream11, MY 11 Circle, Vision 11 हे fantasy App कमी क्रेडिट पॉईंट्स देतात.आणि त्यामुळे ग्रँड लीगमध्ये डिफरेन्शियल पिक म्हणून फायदेशीर ठरतात .
IPL 2025 च्या सर्व ताज्या अपडेट्ससाठी ESPN Cricinfo वर भेट द्या:https://www.espncricinfo.com/series/ipl-2025-1449924
कधी कधी गृहीत धरतो की या खेळाडूंची फलंदाजी येणारच नाही, पण ज्या दिवशी रिंकू सिंगने सलग ५ षटकार ठोकले, त्या दिवसापासून आपण रिंकू सिंगला ओळखतो पण आपल्याही अगोदर त्याला कोण ओळखत असेल तर वेंकी मैसूर जो की KKR Team साठी खेळाडूवर बोली लावतात. त्यांना माहिती होतं .की रिंकू सिंग कोण आहे आणि कसा आहे आणि तो काय करू शकतो,
.मिडल ऑर्डर बॉलर्स
बहुतांश लोक पावर प्ले किंवा डेथ ओव्हर्स मधील गोलंदाजांना महत्त्व देतात, तुषार देशपांडे, श्रेयस गोपाळ, नूर अहमद, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन हे मिडल ओव्हर्स मध्ये सातत्याने विकेट घेतात.अशा गोलंदाजांना व्हाइस कॅप्टन करणे योग्य ठरेल.सेकंड पावर प्ले मध्ये विकेट घेणाऱ्या बॉलरला व्हाईस कॅप्टन करणे अति उपयोगी ठरेल कारण त्याच बॉलर ची दुसऱ्या पारी मध्ये बॅटिंग येन हे जवळपास निश्चित असतं. बॉलिंग मध्ये एक दोन विकेट आणि नंतर बॅटिंगमध्ये दहा ते पंधरा रन्स जरी काढले तरी 60-70 तर फिक्स मिळतात. म्हणून अशा खेळाडूला व्हाईस कॅप्टन करणे योग्य ठरते.
“Hidden Gems” – दुर्लक्षित पण मॅच-विनिंग खेळाडू शोधा
➡️ नावाजलेल्या, प्रसिद्ध खेळाडूंना घेण्यापेक्षा कमी ओळख असलेले खेळाडू निवडणे आणि Small टीम साठी फायदेशीर ठरू शकते. नवख्या बॉलर्स चे विकेट टेकिंग बॉल कोणते आहेत, हे पुढील फलंदाजाला माहित नसते. उदा.Chennai super kings फ्रेंचाईज कधीच नावलौकिक बॉलर्स ला खरेदी करत नाही. तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता. ते कमी इंटरनॅशनल लेव्हल च्या बॉलरला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतात. आणि तोच बॉलर चेन्नई सुपर किंग्स टीमला ट्रॉफी जिंकून देण्यात यशस्वी ठरतो. म्हणून तर आज चेन्नई सुपर किंग्स यशस्वी फ्रेंचाईज पैकी एक आहे. एक आयपीएलची टीम अशा प्लेयर्स वर भरोसा करते. तर मग आपण का करत नाही.
असे प्लेयर्स कधी महत्त्वाचे ठरतात?
रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी आणि लिस्ट AT20 मध्ये खेळलेले खेळाडू Dream11 साठी अत्यंत उपयोगी ठरतात आपण त्यांच्याकडे लक्ष का देत नाही.कारण ते भारताच्या नॅशनल संघात खेळलेले नसतात. पण IPL फ्रेंचाईजी त्यांच्यावर बोली लावतात.त्यांना माहित असतं की हे खेळाडू मैदान घरेलू क्रिकेट मधील बादशहा असतात .आणि मोठी पारी किंवा जास्त विकेट घेतलेले असतात.
त्यामुळे कमी नावलौकिक पण घरेलू क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू वर बोली लावतात. ते कमी क्रेडिट मध्ये जास्त पॉइंट्स मिळवून देतात टीम लवकर रँक करते.एका बाजूने विकेट न गमावता सामना जिंकून देणाऱ्या फलंदाजांना निवडणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे संघाला स्थैर्य मिळते आणि मोठे धाव संख्येचे लक्ष्य गाठता येते.

➡️ जेव्हा लिलाव होतो, तेव्हा आपण ऐकले नसलेल्या खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लागते. आपण आश्चर्यचकित होतो की हा खेळाडू एवढ्या किमतीला का विकला गेला? पण प्लेअर वर बोली लावणारे फ्रेंचाईजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्या खेळाडूला पाहिले असतात. रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी यांसारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ते मोठ्या बोलीत घेतात. आपण घरेलू क्रिकेट बघत नसल्यामुळे हे खेळाडू अनोळखी वाटतात, पण आयपीएलमध्ये तेच उत्कृष्ट प्रदर्शन करतात.उदा. अभिषेक शर्मा. साई किशोर
➡️
त्यामुळे नव्या खेळाडूंची निवड महत्त्वाची ठरते. हे बॉलर असोत, फलंदाज असोत किंवा ऑलराऊंडर—ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेले असावेत. तसेच, परदेशी लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंनाही प्राधान्य द्यावे. फक्त प्रसिद्ध खेळाडूंवर भर न देता हा विचार करा की त्या टीमने त्या प्लेयर्सला अंतिम 11 मध्ये खेळवत आहे. तर त्या खेळाडू मध्ये कोणता तरी एक विनिंग फॅक्टर असेलच मग ते रिस्क घेतात त्या टीमचा हेड कोच कॅप्टन तर मग आपण का नाही. उगाच कोणत्या खेळाडूवर लाखो करोडो तर कोण खर्च करत नाही ना?
➡️ ज्या संघात असे वेगळे खेळाडू असतात, तेच संघ स्पर्धेत यशस्वी ठरतात. संपूर्ण अकरा खेळाडूंपैकी किमान ३-४ खेळाडू हे डिफरेन्शियल पिक्स असावेत. ह्या हिडन जेम्सवर खेळाडूवर विश्वास ठेवून मोठ्या मोठ्या आयपीएल टीम विजेतेपद पटकावत आहेत . तर मग आशा प्लेअर वर आपण भरोसा ठेवून आपण का Grand League जिंकत नाही.
“Lower Order Fighters” – 6th & 7th नंबरवरील गेमचेंजर प्लेयर्स
6 ते 7 नंबरच्या खेळाडूंवर लक्ष ठेवा: काही खेळाडू नाजूक परिस्थितीत उत्तम प्रदर्शन करतात. जेव्हा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर असतो आणि विकेट पडतो, तेव्हा हे खेळाडू संकटमोचक बनतात. त्यांना कमी चेंडूं मध्ये जास्त धावा काढण्याचे आव्हान असते.वन डे आणि T20 मध्ये वेगळे क्लस्टर प्लेयर असतात: ग्रँड लीग जिंकण्यासाठी हे खेळाडू ओळखणे गरजेचे आहे. अशा खेळाडूंना संघात ठेवणे म्हणजे ग्रँड लीगच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे.
Dream11 Grand League & Small League: जिंकण्यासाठी महत्त्वाचे घटक
“Pitch Report” – योग्य खेळपट्टी Dream11 संघासाठी कशी निवडाल?
आपण फक्त पिच बॅटिंग ला मदत करणारी आहे किंवा बॉलिंग ला मदत करणारी आहे. या गोष्टीचा विचार न करता, त्या परिस्थितीत कोणता बॉलर विकेट घेऊ शकतो किंवा बॉलिंग ल सपोर्ट करणारी असेल तर कोणता बॅट्समन पिचवर टिकून राहून रन्स बनवतो हे पाहणे महत्त्वाचं आहे. जर आपण आधीच्या मॅच बघितलेल्या असतील, तर त्यामधून हे कळू शकतं की, या पिचवर जास्त विकेट मिळणार आहेत का? स्पिनरला टर्न मिळतो का? काही वेळा बॉलिंग फ्रेंडली पिचवर सुद्धा मोठे स्कोअर उभे राहतात, पण त्याच ठिकाणी कोणत्या प्रकारचे बॉलर विकेट घेऊ शकतात हे ओळखणे महत्त्वाच ठरते.
त्यामुळे अशा पिचवर विविध कौशल्य असलेल्या खेळाडूंना घेणे गरजेचे आहे. हा डेटा वापरून तुम्ही तुमच्या टीमसाठी योग्य खेळाडू निवडू शकता.फक्त पिच “बॅटिंग फ्रेंडली” किंवा “बॉलिंग फ्रेंडली” आहे असे न समजता, त्या खेळाडूच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा.कोणताही बॉलर फक्त “फेमस” आहे म्हणून त्याला निवडू नका, कारण काही वेळा प्रसिद्ध बॉलर अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीत.
“Time & Toss Advantage” – टॉस आणि वेळेचा योग्य फायदा कसा घ्याल?
टॉस मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर होतो, त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ असतो. त्या अर्ध्या तासांमध्ये व्यवस्थित टीम बनवून घ्या आणि टीम ला समतोल करा.जर टीमने सुरुवातीला बॅटिंग निवडली असेल, तर त्या टीम मधील जास्त फलंदाज निवडा.जर एखाद्या टीमने बॉलिंग निवडली असेल, तर त्या टीमचे बॉलर्स जास्त प्रभाविक असतील तर आपल्या Fantasy cricket Dream 11 टीम मध्ये घ्या.
असं का?
पहिल्या डावात फलंदाजांकडे धावा करण्यासाठी मोकळेपणा असतो.
सहा-सात नंबर पर्यंतही बॅटिंग जाऊ शकते.दुसऱ्या डावात खेळणाऱ्या टीमला विशिष्ट टार्गेट दिलेले असते. त्यामुळे त्यांच्यावर मर्यादा असते.पहिल्या डावात खेळणाऱ्या फलंदाजांना कोणतेही लक्ष्य नसते, त्यामुळे ते जास्त धावा करू शकतात.टीम निवडताना काय लक्ष घ्याल ? संघातील खेळाडू चांगले आहेत की नाही, याकडे जास्त लक्ष न देता तुमच्या टीमला जास्त पॉईंट्स कसे मिळतील यावर लक्ष दया.त्यानुसार योग्य प्लॅनिंग करून तुमची dream 11 Grand League टीम बनवा.
“Bench Strength” – दुर्लक्षित खेळाडू जो सामना जिंकवू शकतो!
जेवढी रणनीती आपण अंतिम 11 खेळाडू निवडण्यासाठी करतो. तेवढीच दोन्ही संघातील बॅकअप प्लेयर बद्दल सुद्धा हीच रणनीती वापरा, नावलौकिक न पाहता सध्याची मागील सामन्यातील त्या खेळाडूचे कामगिरी खेळाडूला आयपीएल मधील टीमने का खरेदी केले, कशामुळे केले आहे, हे आयपीएलच्या कोच ला माहिती असते, पण आपल्याला माहिती नसते. कारण त्यांनी त्याच्यावरती डाव खेळला आहे, कारण त्यांनी या खेळाडूला ओळखले आहे. आपण कोणाला ओळखतो? ज्याचं नाव फेमस आहे त्याला ओळखतो
Dream11 Grand League & Small League: साठी कॅप्टन-व्हाइस कॅप्टन निवडण्याचे नियम

पण आयपीएल कोच कोणाला ओळखतात नाव फेमस नसणारा पण एक्स फॅक्टर असलेला खेळाडूला . निवडून ते त्या मॅच मधून परफॉर्मन्स काढून घेतात.असे खेळाडूंवर पण भरोसा ठेवा, जे परिस्थितीनुसार मॅच पटू शकतात, भले ते अंतिम 11 मध्ये नसतील. कारण आयपीएलमध्ये कधीही कप्तान त्या बॅकअप खेळाडूला उतरवू शकतो आणि आपण तर त्या प्लेयर्स बद्दल विचार केलेला नसतो. आपण काय विचार केलेला असतो? फक्त अंतिम 11 कोणते आहेत? तर हे चूक करू नका.
“Conditional Captain” – परिस्थितीनुसार कर्णधार निवडण्याची कला
“कंडिशनल कॅप्टन” ची संकल्पना वापरा
कॅप्टन निवडताना जास्त लोकांनी कॅप्टन केलेला आहे. म्हणून तुम्ही पण कप्तान करू नका.कप्तान निवडताना हा खेळाडू आवडतो म्हणून एखाद्या खेळाडूला निवडणे हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. भले तेचा फॉर्म कसा का असेना. किंवा आज चालेल या अंदाजावर किंवा आज चालतो की काय असं गृहीत धरून त्याच खेळाडूला घेणं म्हणजे धोका आहे.त्यापेक्षा परिस्थितीनुसार ग्राउंड जर मोठे असतील तर मोठे फटके न मारता एकेरी दुहेरी धाव घेऊन टीमला एका लक्ष पर्यंत पोहोचवतो फलंदाजाला कॅप्टन करा. ग्राउंड छोटे असेल तर स्फोटक फलंदाजाला कॅप्टन करा. ग्राउंड वर जर धुके असतील तर बॉलरला कॅप्टन करा.
“Form Over Reputation” – मोठ्या नावांपेक्षा सध्याचा फॉर्म महत्त्वाचा
आता आपल्याकडे काय होते फॅन्सी क्रिकेटमध्ये जास्त करून, फेमस किंवा आपल्या आवडत्या खेळाडू ला fantasy team मध्ये घेतो.उदाहरणार्थ विराट कोहली फेमस आहे, रोहित शर्मा फेमस आहे, जसप्रीत बुमरा हार्दिक पांड्या—प्रत्येक वेळेस ह्याच खेळाडूंना निवडणे योग्य नाही. म्हणजे थोडक्यात, नवाजलेल्या खेळाडूवर किंवा नावलौकिक असलेल्या खेळाडूवर जास्त भर देऊ नका.
त्यापेक्षा सध्या फॉर्म मध्ये कोण आहे, त्याला निवडा. जगप्रसिद्ध खेळाडूला निवडू नका, कारण पूर्ण ड्रीम इलेव्हन, फॅन्सी क्रिकेट, माय इलेव्हन—सगळेच त्यांना निवडत आहेत. मग त्यामध्ये आपली कुठे रँक येणार? त्यामुळे वेगळ्या डिफरेन्शियल खेळाडूला घ्या. तो प्लेयर्स परफॉर्मन्स करताच आपली टीम एक नंबरचा रँक वर येते.
Dream11 Grand League संघ तयार करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

“Data-Driven Decisions” – अंदाजाने नव्हे, रेकॉर्ड वर विश्वास ठेवा!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे dream11 खेळणाऱ्या सर्व क्रिकेट प्रेमी ने डेटा ठेवणं हा मुख्य काम आहे.”Dream11 टीम तयार करण्यासाठी महत्त्वाचा डेटा: खेळाडूंची आकडेवारी, ग्राउंड रिपोर्ट आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड् जाणून घ्या!”खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यामध्ये सर्व रेकॉर्ड बघा.
आता त्यामध्ये काय बघायचं म्हटलं तर— त्या खेळाडूच्या आजच्या मॅचच्या अगोदर तो किती परफॉर्मन्स केलाय? काय काय केलाय? कोणत्या खेळाडू सोबत, कोणत्या बॉलर्सच्या विरोधात त्याचा काय परफॉर्मन्स आहे? कुठल्या ग्राउंडवर तो कसा खेळतो? पूर्ण डेटा ध्यानात ठेवणं म्हणजेच त्याची मागील कामगिरी आणि त्या टीम्सबरोबर त्याचे काय प्लॅनिंग आहे, त्याचीरणनीती काय आहे, तो कसा खेळेल— ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान ठेवणे गरजेचे आहे.
आता समजा, काही खेळाडू एक विशिष्ट संघाविरुद्ध जबरदस्त सामने खेळतात किंवा काही खेळाडू विशिष्ट ग्राउंडवर उत्तम क्रिकेट खेळू शकतात. तर मग अशा प्लेअरला आपण तिथे घेणे अत्यंत गरजेचे आहे. ह्या गोष्टी सहजासहजी कोणी सांगेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतः डेटा घ्यावा लागेल, तो कलेक्ट करावा लागेल.
कधी कधी मी सांगितलेलं सुद्धा खोटं ठरू शकतं, पण एकंदरीत सांगायचं झालं तर— तुम्ही परफेक्ट आकडे जवळ ठेवूनच fantasy cricket मध्ये उतरा.”Fantasy क्रिकेटमध्ये डेटा हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे! Fantasy cricket tips आणि खेळाडूंचा परफॉर्मन्स: प्रत्येक खेळाडूचा सध्याचा परफॉर्मन्स आणि टीम स्ट्रॅटेजी.
🔗 Cricbuzz Link: https://www.cricbuzz.com
जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
चुकापासून शिकून Dream11 Grand League मध्ये जिंकण्याची संधी वाढवा!
जेव्हा मॅच चालू असते, तेव्हा जे काही परिस्थिती निर्माण होते आहे, त्यावर सखोल विचार करा अभ्यास करा. एखादा खेळाडू लय दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही, पण लोक त्याला घेऊन जातात किंवा त्याचं रेटिंग चांगलं आहे, कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन सिलेक्टेड रेट त्याचा जास्त असेल, तर अशा खेळाडूवर तुम्ही जास्त भरोसा दाखवू नका.
सगळेजण तेच करतात, तर सगळ्यांचीच सेम रँक येणार. पण तुम्हाला सगळ्यांसोबत बसायचं आहे का? नाही ना? जर सगळ्यांपेक्षा वेगळं करून अव्वल रँक ला जायचं असेल, तर मग वेगळी टीम बनवावी लागेल. सेफ खेळाडूंना टीम मध्ये निवडणे टाळा. सेफ खेळाडू मध्ये गुंतलो तर सेफ झोन आलंमध्येच राहणार.
जर सेफ झोनला विचार सोडला , तर मग तुम्ही पहिल्या क्रमांकावर जाऊ शकता.जर एखाद्या खेळाडूला जखम झाली असेल किंवा तो फॉर्ममध्ये नसेल, तर सरळ त्याला इग्नोर करा आणि त्याच्या बदल्यात चांगला खेळाडू निवडा. लहान लहान बदल हेच तुम्हाला मोठी विनिंग करून देतात.