Dream 11 चे पहिले पारितोषक आपण जिंकू स्मार्ट टीम बनवून आपल्या टीमची निवड हे एक अत्यंत महत्त्वाचे टास्क असते. यशस्वी Dream11 टीम तयार करण्यासाठी खेळाडूंचा परफॉर्मन्स, पिच चे प्रकार आणि त्याचा खेळावर होणारा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. यामुळे, खेळाडूंची निवड करतांना थोडे चांगले संशोधन आणि विश्लेषण करणं आवश्यक ठरते. चला, या लेखात आम्ही पिच प्रकार आणि खेळाडूंच्या निवडीसाठी काही टिप्स पाहूया.
1. पिच प्रकार आणि त्याचा खेळावर प्रभाव

१. लाल मातीची पीच
लाल मातीच्या खेळपट्टीवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळतो, आणि तो चांगल्या प्रकारे स्विंग होतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजी साठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरते. चेंडू बॅट वर सहज येतो, त्यामुळे काही अंशी फलंदाजांना फायदा होऊ शकतो. पण, जर वेगवान गोलंदाज योग्य टप्प्यावर चेंडू टाकले, तर त्यांना विकेट मिळण्याची शक्यता जास्त असते. यामुळे, या पिचवर वेगवान गोलंदाजांचे महत्त्व जास्त आहे.
२. काळी मातीची पीच
काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक टर्न घेतो आणि चेंडूचा वेग टप्प्यावर कमी होतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना इथे जास्त फायदा होतो. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत, फिरकी गोलंदाजांना या पिचवर अधिक वाव मिळतो. यामुळे, अशा पिचवर वेगवान गोलंदाजांचा परफॉर्मन्स कमी असतो, कारण चेंडूचा उछाल मर्यादित राहतो आणि स्विंग तुलनेत कमी मिळतो.
फक्त बॅटिंग वर अवलंबून असलेल्या विकेट कीपर वर विश्वास ठेवावा का?
काही विकेटकीपर बॅट्समन ओपनिंगला येतात आणि मोठ्या धावा करू शकतात.
पण जर तो दहा पैकी फक्त 4-5 मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असेल, तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे जोखमीचे ठरू शकते.
अशा खेळाडूचा खराब दिवस असेल, तर तुमच्या Dream11 टीमचे मोठे नुकसान होऊ शकते.
कॅप्टन किंवा व्हाइस-कॅप्टनसाठी ऑलराऊंडर निवडणे फायदेशीर का?

ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करू शकतो, त्यामुळे मॅच मध्ये त्याचा प्रभाव जास्त असतो.
जर विकेटकीपर फेल झाला, तरी ऑलराऊंडर बॉलिंग किंवा बॅटिंग मधू न पॉईंट्स कमावू शकतो.
Dream11 किंवा इतर Fantasy Cricket प्लॅटफॉर्मसाठी ऑलराऊंडर हा नेहमीच सुरक्षित पर्याय असतो.
Dream11 मध्ये दोन्ही स्फोटक ओपनर घेणे योग्य का? जाणून घ्या योग्य टीम कॉम्बिनेशन!
दोन्ही स्फोटक ओपनर घेण्याचा धोका टाळा
जर दोन्ही ओपनर आक्रमक खेळत असतील, तर मोठे स्कोअर करण्याची संधी असते.
पण जर दोघेही लवकर बाद झाले, तर पॉइंट्स मिळवण्याच्या संधी कमी होतात.
अशा परिस्थितीत संपूर्ण टीमचा बॅलन्स बिघडू शकतो.
योग्य टीम कॉम्बिनेशन कसे असावे?
एक ओपनर आक्रमक फलंदाज (स्फोटक) घ्या – उदा. अभिषेक शर्मा
दुसरा ओपनर स्थिर आणि विकेट सांभाळणारा फलंदाज असावा – उदा. शुभमन गिल
अशा प्रकारे, एकजण उच्च स्ट्राईक रेटने खेळला तरी दुसरा टिकून राहील, ज्यामुळे टीमला फायदा होईल.
हा समतोल राखल्याने Dream11 मध्ये जास्त स्थिर पॉईंट्स मिळण्याची शक्यता वाढते.
3.Dream11 फॅन्टसी क्रिकेट टीम मध्ये 3 क्रमांकावर कोण?

बॅट्समन निवडताना काही महत्त्वाची गोष्टी लक्षात घ्या:
फॉर्म आणि सरासरी रन: सतत चांगली कामगिरी करणारे आणि विश्वासार्ह फॉर्ममध्ये असलेले प्लेयर्स निवडा.
संघाच्या गरजा आणि खेळपट्टीचा अंदाज: खेळपट्टीचा विचार करा.
सपाट खेळपट्टीवर खेळताना वन डाऊन बॅट्समन मोठी खेळी करू शकतो.
रिस्क फ्री प्लेयर: आक्रमक असले तरी स्थिरता ठेऊन खेळणारे बॅट्समन चांगले ठरू शकतात.
4. Dream11 टीम मध्ये -ऑलराऊंडर ची भूमिका
“Dream 11 जिंकण्यासाठी ऑलराऊंडर सेक्शन सर्वात महत्त्वाचा आहे. ऑलराऊंडर तीन प्रमुख विभागांमध्ये पॉइंट्स देतो: बॅटिंग, बॉलिंग, आणि फिल्डींग. यामुळे त्याला एक कॅप्टन बनवणे खूप फायदेशीर ठरते. ज्या प्रमाणे बॅट्समन आणि बॉलर आपली कामगिरी त्यांच्या संबंधित क्षेत्रावर निर्भर असते, त्याचप्रमाणे ऑलराऊंडर दोन्ही क्षेत्रांमध्ये (बॅटिंग आणि बॉलिंग) कार्यक्षम असतो. जर बॅटिंगमध्ये फेल झाला, तर बॉलिंग मध्ये तो कव्हर करू शकतो किंवा याउलट. त्यामुळे ऑलराऊंडर खेळाडू हे बॅट्समन आणि बॉलर पेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात कारण त्याचे कार्य दोन्ही विभागांवर आधारित असते.
5.लोअर ऑर्डर मध्ये कोनाला घ्यावे ?
Dream11 टीमला मोठे पॉइंट्स मिळवण्यासाठी योग्य बॉलर निवडण महत्त्वाचं आहे.फक्त प्रॉपर बॉलर किंवा ऑलराऊंडर घेण्यापेक्षा, बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये योगदान देणाऱ्या बॉलर वर विश्वास ठेवा. असे खेळाडू तुमच्या fantasy संघाला मोठा फायदा करून देतील!
1. टीम बॅलन्स ठेवतो:फक्त गोलंदाजीच नाही, तर काही महत्त्वाचे धावा देखील काढतो, ज्यामुळे टीम बॅलन्स राहतो.
2. विकेट घेतल्याने बोनस पॉइंट्स मिळतात:2 ओव्हर्समध्ये 1-2 विकेट्स घेतल्यास, तुम्हाला फँटसी पॉइंट्स पटकन मिळतात.
3. बॅटिंगमध्ये जलद धावा काढतो:30-35 धावा आणि उच्च स्ट्राइक रेट असलेला बॉलर संघासाठी फायदेशीर ठरतो.
6. Dream11 मध्ये रिस्की आणि सेफ प्लेअर्सचे महत्त्व:
सेफ प्लेअर्स कोण असतात?
सेफ प्लेअर्स म्हणजे जे प्रत्येक सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करतात. हे खेळाडू रन करतात किंवा विकेट घेतात आणि बहुतांश लोक त्यांना आपल्या फॅन्टसी टीममध्ये निवडतात.
उदाहरण:
विराट कोहली रोहित शर्मा,जोस बटलर, जसप्रीत बुमराह,राशिद खान
रिस्की प्लेअर्स निवडताना हे लक्षात ठेवा:
प्लेअर च्या फॉर्म आणि पिच च्या परिस्थितीनुसार रिस्क घ्या.अचानक चमकणारे खेळाडू कोण असू शकतात, याचा अभ्यास करा.
कॅप्टन किंवा व्हाइस कॅप्टन
म्हणून कधी कधी रिस्की प्लेअर्स निवडल्यास मोठा फायदा होऊ शकतो.कोणते खेळाडू कमी टक्केवारीने निवडले गेले आहेत, त्यावर नजर ठेवा.
7. fantasy cricket साठी ओपनिंग बॉलर्स का फायदेशीर असतात?

स्विंग आणि बाऊन्स चा फायदा: नवीन चेंडू स्विंग होतो, त्यामुळे फलंदाज अडचणीत पडतो.
पॉवर प्ले मध्ये विकेट्स घेण्याची संधी: पहिल्या सहा षटकांमध्ये फिल्डिंग निर्बंध असतात, त्यामुळे फलंदाज फटके मारायचा प्रयत्न करतो, आणि विकेट पडण्याची शक्यता वाढते.
रन गती नियंत्रित करता येते:कमी धावा देणाऱ्या ओपनिंग बॉलर्स मुळे विरोधी संघ दबावात येतो.
उदाहरण: भुवनेश्वर कुमार,ट्रेंट बोल्ट, मोहम्मद सिराज – हे सर्व उत्कृष्ट स्विंग बॉलर्स आहेत, जे पॉवर प्ले मध्ये विकेट्स काढतात.
9.Dream11 टीम साठी महत्त्वाचे
डेथ ओव्हर बॉलर्स का महत्त्वाचे?
शेवटच्या ओव्हर्स मध्ये विकेट्स मिळतात: फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे विकेट मिळण्याची शक्यता जास्त असते.
यॉर्कर आणि स्लो बॉलिंग चा प्रभाव: डेथ ओव्हर्स मध्ये चांगली बॉलिंग करणारे बॉलर रन रोखू शकतात आणि विकेट्स मिळवतात.
Fantasy पॉइंट्स मिळवण्यासाठी उत्तम: डेथ ओव्हर्स मध्ये विकेट घेणाऱ्या आणि रन कमी देणाऱ्या बॉलर कडे जास्त पॉइंट्स मिळवण्याची संधी असते.
उदाहरण: जसप्रीत बुमराह, सुनील नारायण, संदीप शर्मा – हे सर्व डेथ ओव्हर्स मध्ये प्रभावी ठरतात.
9. Dream 11 टीम मध्ये योग्य बॉलर कसा निवडावा अशा बॉलरचा विचार करा जो चार ओव्हर्स टाकेल आणि विकेट्स घेईल.
सुरवातीला आणि डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग करणाऱ्या खेळाडूवर भर द्या.
केवळ विकेट घेणारा नव्हे, तर किफायतशीर (किफायतशीर) बॉलर घ्या, ज्यामुळे पॉइंट्स जास्त मिळतील.
रन जास्त देणाऱ्या बॉलर्स पासून सावध राहा, कारण पॉईंट वर परिणाम होतो.
“Dream11 टीम साठी प्रभावी बॉलर्स
Dream11 Fantasy Cricket टीम बनवत असताना असे गोलंदाज शोधायचे जे विकेट घेतात पण खूप रन खर्च करत नाहीत. अशा गोलंदाजांना प्राधान्य द्यायला हवं ज्यांचा वेग बदलून, स्पिन किंवा स्लो बॉल्स टाकण्या वर विश्वास असतो. हे गोलंदाज बॅट्समन ला गतीत फसवून त्यांना आउट करतात. उदाहरणार्थ, हर्षल पटेल, हार्दिक पांड्या आणि ब्रावो यांचे बॉलिंग तंत्र यामध्ये अचूक आहे. त्यांच्या गतीत फार बदल नसलं तरी ते गतीवर नियंत्रण ठेवून विविध प्रकारचे बॉल्स टाकतात, ज्यामुळे विकेट्स मिळवता येतात.
घरेलू क्रिकेटमधून आलेले खेळाडू कधीही मॅच फिरवू शकतात
1.काही खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फारसे प्रसिद्ध नसतात, पण त्यांचा रणजी क्रिकेटमधला फॉर्म जबरदस्त असतो.
2.उदाहरणार्थ, जितेश शर्मा आणि देवदत्त पड्डीलकल यांसारखे खेळाडू कधीही मॅचचा प्रवाह बदलू शकतात.
3.मोठ्या नावांवर भरवसा ठेवताना त्यांच्या सद्यस्थितीतील फॉर्म लक्षात घेणं आवश्यक आहे.
फक्त मोठ्या नावांवर विश्वास ठेवू नका
1.आपण बहुतांश वेळा मोठ्या खेळाडूंना निवडतो, पण ते फेल झाल्यास संपूर्ण टीम दबावाखाली येते.
2.त्यामुळे, नवोदित किंवा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे.
बर्थडे किंवा खास माईलस्टोन असलेल्या खेळाडूंवर लक्ष द्या
खेळाडूंचा बर्थडे, 100वी मॅच किंवा पाहिला मॅच असल्यास त्यांचा परफॉर्मन्स चांगला होण्याची शक्यता वाढते.अशा खेळाडू भावनिकदृष्ट्या अधिक प्रेरित असतात आणि सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात.
“ही होती Fantasy Cricket Team Selection Guide, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वोत्तम टिप्स दिल्या आहेत. तुम्ही या मार्गदर्श काचा वापर करून Dream11 किंवा इतर Fantasy Cricket Platforms वर जास्तीत जास्त फायदे मिळवू शकता.
Dream11 च्या ऑफिशियल वेबसाईटसाठी लिंक खालील प्रमाणे आहे:
“Dream11, My11Circle आणि Vision11 खेळायचं आहे सर्व नियम आणि टिप्स इथे आहेत!”
पूर्ण माहिती मराठीत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.